Dombivli Forum: Online portal for City of Dombivli

You are here:

Articles

केडीएमसीत 100 कोटींचा तात्पुरता अपहार

E-mail Print PDF

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स प्रणालीत अनेक त्रुटी असल्याचे ताशेरे भारताचे नियंत्रण आणि महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालात ओढण्यात आले आहेत. कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स प्रणालीत अनेक त्रुटी असल्याचे ताशेरे भारताचे नियंत्रण आणि महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालात ओढण्यात आले आहेत. पाणीपट्टी, टॅक्स आणि नगररचना विभाग या खात्यांत अनेक दोष आढळून आले असून, संगणक प्रणालीतून डिलिट केलेल्या कोटय़वधींच्या रकमेचा पुरावाच नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून, हा अपहार असल्याचेही अहवालात म्हटले आहे. जवळपास 100 कोटी रुपयांचा तात्पुरता अपहार झाल्याने खळबळ उडाली आहे.

|कल्याण-डोंबिवली महापालिकेने 1999 मध्ये सुरू केलेल्या ई-गव्हर्नन्स योजनेचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाल्यानंतर राज्यातील अन्य पालिकांनी त्याचे अनुकरण केले. मात्र, या योजनेत काही त्रुटी असल्याचे कॅगला आढळले आहे. केडीएमसीच्या लेखापरीक्षणाचा कॅगचा अहवाल विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात आला होता. यात पाणीपट्टी बिलात व मालमत्ता कराच्या बिलात दोष असून, पाणी बिलाची 23 हजार 908 प्रकरणांतील सुमारे 21 कोटी रुपयांची बिले डिलिट करण्यात आलेली आहेत. Read more....

Source: http://www.prahaar.in/mumbai/54126.html

 

Dombivli Bird Race - 22 Jan 2012

E-mail Print PDF
User Rating: / 1
PoorBest 

Dombivli Bird Race 2012 is being organized by NYASS Trust and Kalyan-Dombivli Municipal Corporation in January 2012.

What is bird race?

Dombivli Bird race is an event which involves identifying as many bird species as possible during the day of 22nd Jan, in Dombivli and surrounding areas. All interested bird and nature lovers are welcome to participate in it.

Dombivli has a wide diversity of birds. Even in crowded parts of the city, birds like sunbirds, orioles, barbets can be seen. A wide range of migratory birds is also seen at Dombivli creek. But due to habitat destruction, this bird life is on the verge of becoming endangered or worse, locally extinct.

Creating awareness is the first step towards conservation. Though it is a race just do not participate with the intention to win the race but to enjoy the nature. Participate to admire aesthetic value of nature and birds.

Dombvli Bird Race will be held on 22nd January 2012.

There will be an* orientation workshop* for the participants on *21st January 2012* where organizers and experts will give you guidelines on identification and data entry in logbook.

Who can participate?

Students, photographers, teachers, house wives, working class, shopkeepers, senior citizens, other professionals, experts etc. can participate in Bird Race irrespective of age, occupations, educational qualification.

The only criterion for the participation in Bird Race is, you should have interest in birds.

How to participate?

please go through the following link and register online. Last date for registration is 15th January 2012. There is no Registration Fee to participate in the Dombivli Bird Race.

http://dombivlibirdrace.webs.com/

source

 

 

खड्ड्यातील 'नगरी'ला पुरस्कार

E-mail Print PDF
User Rating: / 3
PoorBest 

 

Source: Maharashtra Times - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9156711.cms

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याबद्दल पालिकेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असली आणि निकृष्ट रस्त्यांबद्दल आयुक्त व महापौरांवर जनतेची जाहीर माफी मागण्याची वेळ ओढवली असली तरी, याच रस्त्यांचे पालिकेने 'उत्कृष्ट' काम केल्याचा 'साक्षात्कार' होऊन अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने पालिकेचा 'नगररत्न पुरस्कार' देऊन शुक्रवारी गौरव केला! वाहन चालवणे सोडाच, धड चालता येईल इतक्याही लायकीचेही रस्ते शहरांत नसताना केडीएमसीने हा पुरस्कार कसा पटकावला, याबद्दल कल्याण-डोंबिवलीकर आश्चर्य व्यक्त करत आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत ३३५ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी ९० किमी रस्ते भुयारी गटार योजनेसाठी तर, ८० किमी रस्ते पाणीपुरवठा योजनेसाठी खोदण्यात आले. गेल्या २ वर्षांपासून सुरू असलेल्या या कामांमुळे रस्त्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. एरवी निवडणुकीत विकासकामे हा प्रचाराचा मुद्दा होत नसला तरी मागील वषीर् झालेल्या केडीएमसीच्या निवडणुकीत खड्ड्यांमध्ये हरवलेल्या रस्त्यांचा मुद्द्यांभोवती प्रचार राहिला.

निवडणुकीनंतरही येथील रस्त्यांची स्थिती पालटली नसून ३१ मे आधी रस्ते सुस्थितीत आणण्याचे आश्वासन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी दिले होते. ही डेडलाइन पाळणे प्रशासनाला शक्य झाले नाही व त्याबद्दल आयुक्त रामनाथ सोनवणे व महापौर वैजयंती गुजर यांच्यावर महासभेत जनतेची जाहीर माफी मागण्याची नामुष्की ओढवली. पावसाळ्यात रस्तेदुरुस्ती शक्य नसल्याने आता ती बंद असून ऑक्टोबरनंतरच या कामांना पुन्हा सुरुवात होऊ शकेल. याचा अर्थ पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांतूनच रहिवाशांना वाट काढावी लागणार आहे.

खड्ड्यांवरून प्रशासन सतत टीकेचे धनी झाल्याने पावसाळा तोंडावर येउन ठेपला असताना काही ठिकाणी वेगाने रस्तेदुरुस्ती सुरू झाली. मात्र आत्ताच डांबरीकरण झालेल्या डोंबिवलीतील दीनदयाळ रोड, टंडन रोड, नवापाडा येथील रस्त्यांना पुन्हा खड्डे पडू लागले आहेत. कल्याणात मुरबाड रोडसारख्या मुख्य रस्त्याचे सिंडिकेट परिसरात अतिशय अरुंद स्वरुपात डांबरीकरण करण्यात आले. नॅशनल हायवे सारखा रस्ता बिर्ला कॉलेज परिसरात केविलवाण्या स्थितीत आहे. रस्त्यांची कामे निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी पालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्याकडेही आल्या असून त्यांनी एक्झिक्युटीव्ह इंजिनीअर चंदकांत कोलते, प्रमोद कुलकणीर् व हायड्रॉलिक इंजिनीअर अशोक बैले यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रातील रस्त्यांबद्दल मिळालेल्या पुरस्काराने सर्वांच्याच भिवया उंचावल्या आहेत

 

 

Electric Meters in Dombivli

E-mail Print PDF
User Rating: / 1
PoorBest 

Source: http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/8170485.cms

सर्वाधिक वीजबिलाची वसुली होत असली तरी महावितरण कंपनीकडे पुरेसे नवे वीजमीटरचउपलब्ध नसल्याने नादुरुस्त मीटर बदलणे कंपनीच्या आवाक्याबाहेर गेले आहे . मात्र याजुन्या मीटरमुळे डोंबिवलीकरांना सर्रास सरासरी बिले पाठविण्यात येत असून त्याविरोधातनाराजी व्यक्त होत आहे .

डोंबिवलीत लाख ६० हजार वीज ग्राहक आहेत . त्यांच्याकडून होणारी वीजबिलाची वसुली१०० टक्क्यांपेक्षा अधिक आहे . मीटर रीडिंगमध्ये अचूकता यावी यासाठी अनेक ठिकाणीइलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याचे काम सुरू आहे . मात्र काही ठिकाणी जुने मीटरच असूनत्यापैकी बहुतांश नादुरुस्त असल्याने ते बदलून द्यावेत , अशी मागणी ग्राहक करीत आहेत .परंतु महावितरणकडे नवी मीटर नसल्याने सरासरी बिल डोंबिवलीकरांना पाठविली जातअसल्याने त्यावरुन वीज ग्राहक महावितरणचे कर्मचारी यांच्यात काही वेळा वाद उद्भवतआहेत .

 

नव्या वर्षात कल्याण-डोंबिवली कचरामुक्त

E-mail Print PDF

Source: Prahar

कल्याण-डोंबिवलीतील कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक पद्धतीचा आराखडा केडीएमसीने तयार केला आहे. जानेवारीत प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे कचरामुक्त शहर हीच कल्याण-डोंबिवलीकरांसाठी नववर्षाची भेट ठरणार आहे.

डोंबिवली- कचरा ही जगातील सर्वच शहरांची सर्वात मोठी समस्या आहे. ती कायमची निकालात काढण्यासाठी राज्याच्या सुवर्ण नगरोत्थान महाअभियानांतर्गत 43 कोटी 75 लाख रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यात कल्याण-डोंबिवलीतील कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक पद्धतीचा आराखडा केडीएमसीने तयार केला आहे. जानेवारीत प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे कचरामुक्त शहर हीच कल्याण-डोंबिवलीकरांसाठी नववर्षाची भेट ठरणार आहे.

महापालिका क्षेत्रातदररोज 550 मेट्रिक टन कचरा गोळा होतो. हा सर्व कचरा कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. त्याची क्षमता संपली असूनही गेल्या अनेक वर्षापासून तेथे कचरा टाकला जात आहे. त्यामुळे प्रदूषण आणि दुर्गंधीचा त्रास कल्याणकरांना सहन करावा लागत आहे.  या प्रकल्पांतर्गत राज्य सरकारला पालिकेकडून 50 टक्के अनुदान आणि 50 टक्के कर्ज मिळणार आहे. यात कचऱ्याची दोन भागांत विभागणी करण्यात येईल. कचरा गोळा करून वाहतूक करणं व कच-याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणं, असे हे टप्पे असतील. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून दहा कोटींचं अनुदान मिळालं आहे. त्यात प्रत्येक वॉर्डासाठी एक मिनी टिपर अशा एकूण 70 गाडय़ा, 10 डंपर प्लेसर, 22 मिनी कॉम्पॅक्टर, एक वॉशिंग टँकर, कचरा उचलण्याच्या 22 गाडय़ा अशा कचरा वाहून नेणाऱ्या एकूण 125 नवीन गाडय़ा महापालिकेत दाखल होणार आहेत.

Read more..

 
  • «
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  4 
  •  5 
  •  6 
  •  7 
  •  8 
  •  9 
  •  10 
  •  Next 
  •  End 
  • »
Page 1 of 16

Vastushastra Consultant

Advertise here

Call 9819024528