Dombivli Forum: Online portal for City of Dombivli

You are here:

डोंबिवलीच्या फडके रोडवर तरुणाईचे ‘राज’

E-mail Print PDF
User Rating: / 0
PoorBest 

Source: Loksatta

पारंपरिक कपडे परिधान केलेले तरुण-तरुणी, विविध परफ्युम्स आणि अत्तराचा दरवळ, रस्त्यावर रेखाटलेली मोठी रांगोळी आणि उसळलेली तरुणाई हे शुक्रवारच्या  पहाटेचे डोंबिवलीच्या प्रसिद्ध फडके रोडवरचे दृश्य होते. तरुणाईच्या या उत्साहात यंदाच्या वर्षी दस्तुरखुद्द  मनसेचे प्रमुख राज ठाकरे सहभागी झाले होते.दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रोडवर तरुणाईचा सागर उसळलेला असतो. तरुण-तरुणी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा त्यात विशेष सहभाग असतो. डोंबिवलीचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फडके रोडवरील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे दिवाळीच्या पहिल्या दिवशी येथे ‘युवा शक्ती आणि भक्तीदिन’ साजरा केला जातो. या अंतर्गत विविध स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम येथे होतात.
फडके रोडवरील दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या या उत्साहाची महती राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली होती. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या ‘मनसे’लाही येथील मतदारांनी विशेषत: तरुणाईने भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे मतदारांचे, पर्यायाने तरुणाईचे आभार मानण्यासाठी आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी व फडके रोडवरील तरुणाईचा उत्साह अनुभवण्यासाठी राज आज सकाळीच डोंबिवलीत आले होते.

या वेळी बोलताना राज म्हणाले की, निवडणुकीच्या काळात जाहीर सभेच्या वेळी फडके रोडवरील रात्रीची गर्दी पाहिली होती. आता दिवाळीच्या पहिल्या दिवशी येथील सकाळची गर्दी आणि उत्साह अनुभवण्यासाठी मी येथे आलो आहे. मला असे कळले आहे की, याच फडके रोडवर अनेकांची लग्ने जुळलेली आहेत. छान, त्यामुळे मी आता तुमच्या पाहण्याच्या कार्यक्रमात आड येत नाही. तुमचे चालू द्या, असेही राज यांनी मिश्कीलपणे सांगितले.

महापालिका निवडणुकीत तुम्ही ‘मनसे’ला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानत त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

राज यांच्या या छोटेखानी मनोगतालाही उपस्थित तरुणाईची उत्स्फूर्त दाद मिळाली. प्रारंभी राज यांनी गणेश मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. गणेश मंदिर संस्थानतर्फे राज यांचा सत्कारही करण्यात आला.

Read more

 

Add comment


Security code
Refresh

Vastushastra Consultant

Advertise here

Call 9819024528