Source: Saakal
अवेळी वीजप्रवाह खंडित होण्याच्या त्रासातून कल्याण-डोंबिवली शहरवासीयांना आता मुक्ती मिळणार आहे. पडघा ते डोंबिवली या 220 केव्हीच्या डबल लाईनबरोबरच कळवा व तळोजा येथून 100 केव्हीच्या दोन अतिरिक्त लाईन्स टाकण्याचे काम मार्गी लागले असल्याने सोमवार, 15 नोव्हेंबरपासून त्यांना अखंडित वीज मिळणार आहे. एखाद्या वीजमार्गावर बिघाड झाल्यास शहरातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित न करता इतर तीन मार्गांपैकी एका मार्गावरून वीजपुरवठा चालू ठेवता येणार आहे. परिणामी वीजभारनियमनातून मुक्ती मिळत नसली तरी वेळी-अवेळी खंडित होणारा वीजपुरवठ्याच्या त्रास नागरिकांना सोसावा लागणार नाही.
चारपैकी एका लाईनमध्ये जरी काही बिघाड झाला, तरी त्या लाईनची दुरुस्ती होईपर्यंत उर्वरित तीन लाईन्सवरून शहराला वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांचे भारनियमन सुटले नसले तरी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
Read more



