Dombivli Forum: Online portal for City of Dombivli

You are here:

कल्याण-डोंबिवलीचा महापौर आज ठरणार

E-mail Print PDF
User Rating: / 0
PoorBest 

Source: Loksatta

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दहाव्या महापौरपदासाठी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता निवडणूक होणार आहे. महापौरपदासाठी युतीतर्फे वैजयंती घोलप-गुजर तर अपक्षांतर्फे उषा वाळंज निवडणूक रिंगणात आहेत. उपमहापौरपदासाठी निवडणूक होणार असून युतीतर्फे भाजपचे बुधाराम सरनोबत, तर अपक्षांतर्फे मयूर पाटील निवडणूक रिंगणात आहेत.

युतीने स्वत:चे ४० व काही अपक्षांची मोट बांधून सत्ता-स्थापनेची काटेकोर व्यूहरचना तयार केली आहे. शिवसेनेचे सर्व नगरसेवक वसई परिसरात भूमिगत आहेत. उद्या सकाळी ही मंडळी स्वतंत्र बसमधून पालिकेत दाखल होणार आहेत. युतीचे संख्याबळ, काँग्रेस आघाडीत नसलेला समन्वय, मनसेची तटस्थता त्यामुळे युतीच्या वैजयंती घोलप या महापौरपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पक्षीय बलाबल: एकूण जागा- १०७, शिवसेना - ३१, मनसे- २७, काँग्रेस- १५, राष्ट्रवादी -१४, भाजप- ०९, अपक्ष-११

Read more

 

 

Add comment


Security code
Refresh

Vastushastra Consultant

Advertise here

Call 9819024528