Source: http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/8170485.cms
सर्वाधिक वीजबिलाची वसुली होत असली तरी महावितरण कंपनीकडे पुरेसे नवे वीजमीटरचउपलब्ध नसल्याने नादुरुस्त मीटर बदलणे कंपनीच्या आवाक्याबाहेर गेले आहे . मात्र याजुन्या मीटरमुळे डोंबिवलीकरांना सर्रास सरासरी बिले पाठविण्यात येत असून त्याविरोधातनाराजी व्यक्त होत आहे .
डोंबिवलीत १ लाख ६० हजार वीज ग्राहक आहेत . त्यांच्याकडून होणारी वीजबिलाची वसुली१०० टक्क्यांपेक्षा अधिक आहे . मीटर रीडिंगमध्ये अचूकता यावी यासाठी अनेक ठिकाणीइलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याचे काम सुरू आहे . मात्र काही ठिकाणी जुने मीटरच असूनत्यापैकी बहुतांश नादुरुस्त असल्याने ते बदलून द्यावेत , अशी मागणी ग्राहक करीत आहेत .परंतु महावितरणकडे नवी मीटर नसल्याने सरासरी बिल डोंबिवलीकरांना पाठविली जातअसल्याने त्यावरुन वीज ग्राहक व महावितरणचे कर्मचारी यांच्यात काही वेळा वाद उद्भवतआहेत .




Comments
RSS feed for comments to this post