Dombivli Forum: Online portal for City of Dombivli

You are here:

Articles

अश्शी डोंबिवली सुरेख बाई!

E-mail Print PDF
User Rating: / 1
PoorBest 

Article by - श्रीपाद कुळकर्णी, व्यावसायिक, रोटरी क्लब-माजी अध्यक्ष डोंबिवली Loksatta - http://t.co/8aCetCg

सरदारजीवर अनेक विनोद केले जातात, पुण्याच्या दरवाजावरील पाटय़ांवर विनोद केले जातात.तसेच चुटके आता कल्याण-डोंबिवली पालिकेच्या कारभारावर करण्याची वेळ आली आहे. कारण दोष कुणाचा? लोकप्रतिनिधींचा तर अजिबात नाही. कारण आम्ही मतदारांनीच त्यांना निवडून दिलेले असते. त्यामुळे ते बिच्चारे त्यांच्या पध्दतीने काम करीत असतात. त्यात हस्तक्षेप करण्याचा आम्हा मतदार नागरिकांना अजिबात अधिकार नाही. कारण आम्हीच मतदारांनी त्यांना मतदान केलेले असते. मग मतदार नागरिकांचा दोष आहे का? तर त्याहून अजिबात नाही. कारण ते पण बिच्चारे सात सत्तावन, आठ बावन करीत मेंढरासारखे सकाळी लोकल पकडून मुंबईत जातात आणि संध्याकाळचे तशाच लोकल पकडून कल्याण-डोंबिवली शहरात फक्त निवासासाठी येतात. मतदार नागरिक हा सकाळी सहा ते रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत आपल्या पोटाच्या खळगीसाठी मुंबई परिसरात नोकरी, व्यवसायानिमित्त अडकून पडलेला असतो. तो जर आपले नगरसेवक काय करतात, आपले मत सत्कार्मी लागले का म्हणून ‘वॉच’ ठेवण्यासाठी स्वत:च्या नोकरीला दांडय़ा मारून घरी बसू लागला तर एक दिवस त्या बिच्चाऱ्यावर अ‍ॅल्युमिनियमचा ‘वाडगा’ हातात घेऊन फिरण्याची वेळ येईल. हा चाकरमानी माणूस हुशार आहे. त्यामुळे मतदान केले की तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करतो, असे समजून आपल्या घरगाडय़ात गुरफटून गेलेला असतो. घरात तुळस असते, पण त्या लोकलच्या टाईम टु टाईममुळे तिला बिच्चारीला कधी पाणी पण घालायला वेळ नसतो. त्यामुळे लोकांनी रस्त्यावर झाडे लावून त्याचे संगोपन करावे वैगरे भाषणात ठीक, पण लोकप्रतिनिधी नियमित हे उपक्रम राबवितात का? तर पाऊस सुरू झाल्यावर, त्यानंतर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला. एकदा ती रोपं खड्डय़ात लावली का ती खड्डय़ातून वर आलेत की त्यांना पालवी फुटले की त्यांना कोणी पाणी टाकतंय याचा कधीच कोणी विचार करीत नाही. वृक्षारोपणापुरता पैशांचा थोडा चुराडा केला जातो. आमचा नगरसेवक, लोकप्रतिनिधी शहरासाठी काहीतरी करतो, एवढा देखावा आमच्या मनाला त्यावेळी थोडा सुख देऊन जातो. आता डोंबिवली हिरवीगार होणार.असे चित्र उभे केले जाते. पण ऑक्टोबर हिटच्या तडाख्यानेच आम्ही घाम पुसून गारेगार होऊन जातो तिथे हिरवेगारचा काय प्रश्न?

 

MNS and not Sena is Congress rival in Kalyan-Dombivali: Rane

E-mail Print PDF

(Source: Sakaal) http://bit.ly/aaPjZN

Maharashtra Revenue Minister Narayan Rane today said Raj Thackeray-led MNS and not Shiv Sena was its main rival in the October 31 Kalyan-Dombivali Municipal Corporation (KDMC) elections. Addressing a press conference to release the first list of 38 candidates, Rane who is the election-in charge, claimed that the Sena, which is currently in power in the civic body, would finish third at the hustings. "Sena influence in Mumbai and Thane districts is waning.   Our rival here is MNS," he said. Congress is contesting 55 and coalition partner NCP will field candidates in 52 wards for the 107 member municipal body, situated on the outskirts of Mumbai. Rane said better civic amenities and effective infrastructure would be the focus point of the Congress-NCP campaign.   He said the two coalition partners would issue a joint manifesto. Rane accused the Sena of neglecting the Kalyan-Dombivali towns.

Read more: http://bit.ly/aaPjZN

 

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक

E-mail Print PDF
User Rating: / 1
PoorBest 

लोकप्रतिनिधींनो,विकासाची ‘मुळे’ कुरतडू नका!

पालिकेच्या कारभाराचे  दिवे आणि प्रकाशमाधव जोशी अध्यक्ष, टाटा टेली सव्‍‌र्हिसेस (लीगल व कंपनी सेक्रेटरी) , Article by Mr. P. Joshi, / Loksatta - http://bit.ly/9CGT90

डोंबिवली हे आता शहर झाले. पूर्वी ते गाव होते. घरातील कुटुंबाचा पसारा वाढू लागला, तशी कुटुंबाच्या सोयीसाठी घरातील काही मंडळी एक हवेशीर जागा, मोकळे वातावरण म्हणून डोंबिवली एमआयडीसीत राहण्यास आली. आखीव, रेखीव रस्ते, गजबज नाही. त्यामुळे हा परिसर पाहिलेला कोणीही माणूस एमआयडीसीतील जागेच्या मोहात पडत असे. या भागात बाहेरून माणसे आली आहेत नि ती तेथे राहत आहेत, असा गैरसमज कोणी करू नये. शहरालगतची गावे ग्रामपंचायत हद्दीत गेल्याने एमआयडीसी भाग ग्रामीण भागात गेला आहे. मात्र या भागाची पूर्ण नाळ डोंबिवली शहराशी जोडली आहे. आपले गाव स्वच्छ सुंदर असावे, गावाविषयी बाहेर कोणी दोन शब्द बोलावेत असे साहजिकच वाटते. डोंबिवलीत नगरपालिका राजवटीत प्रशासकांनी प्रचंड धुमाकूळ घालून अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिले असे आजही म्हणतात. त्याला राजकीय समर्थन असल्याशिवाय ते शक्यच नाही. त्या काळच्या प्रशासकांचे बोगस सही शिक्के आतापर्यंत वापरात होते. मग का नाही उभी राहणार शहरात ६७ हजार अनधिकृत बांधकामे? तत्कालीन प्रशासक फक्त अनधिकृत बांधकामांच्या मागे लागल्याने शहराचा आखीव-रेखीव आराखडा करण्यास कोणाला वेळच मिळाला नाही. त्याचे चटके शहरातील दुसऱ्या-तिसऱ्या पिढीला बसत आहेत.

 

‘मनसे’चे १०० उमेदवार जाहीर

E-mail Print PDF

सुशिक्षित, सामान्य कार्यकर्ते, नवख्या चेहऱ्यांना प्राधान्य (Loksatta 12 October, 2010 / http://bit.ly/a4PPMF)

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या १०० उमेदवारांची यादी रविवारी दुपारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. यादीत सर्व नवखे चेहरे, सामान्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. सुदेश चुडनाईक, फैजल जलाल या विद्यमान नगरसेवकांना, वैशाली दरेकर-राणे, दीपिका पेडणेकर, अनिस म्हात्रे या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उर्वरित सात प्रभागांचे उमेदवार दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहेत.

डॉक्टर, वकील, व्यवस्थापन तज्ज्ञ, व्यावसायिक, निमशासकीय नोकरदार, कमी शिकलेले, पण सामाजिक जाणीव असलेल्यांना यादीत प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. प्रभागनिहाय उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे  (कंसात प्रभाग क्रमांक दिले आहेत.):-

 

डोंबिवलीत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याचा सपाटा

E-mail Print PDF

(Source: Loksatta)http://bit.ly/9rN106


पालिका निवडणुकीच्या काळात अनेक झोपडी दादा, काहींनी सरकारी जमिनीवर मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी केली आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आज सकाळी ह प्रभागात रेतीबंदर रोड रस्त्यावर असणारे ११ गाळे जमीनदोस्त करण्यात आले. फ प्रभागात एका झोपडीदादाने बांधलेले दोन हजार चौरस फुटाचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.

फ प्रभागात चोळे हद्दीतील बंदिश पॅलेसमागील जागेवर एका तथाकथित झोपडीदादा सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकाम करीत आहे. हे बांधकाम आयुक्त रामनाथ सोनावणे, उपायुक्त अजीझ शेख यांच्या आदेशावरून ह प्रभागाचे प्रभाग अधिकारी व उपायुक्त सुभाष भुजबळ, कुमावत यांच्या पथकाने जमीनदोस्त केले. तोडलेले बांधकाम झोपडीदादा पुन्हा उभा करीत असे. अशाप्रकारे चार वेळा बांधकाम तोडूनही त्या झोपडीदादाने बांधकाम उभे केल्याने भुजबळ यांनी त्या जागेचा सात-बारा काढला, तेव्हा ती जमीन सरकारी असल्याचे उघड झाले. याबाबत तहसीलदारांना पालिकेतर्फे सरकारी जमीन व या झोपडीदादा कारवाई करण्याचे पत्र देण्यात येणार आहे. या झोपडीदादाने त्याच्याच पुढे मोठा मंडप उभारून त्या जागेवरही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालविला होता, पण तो मंडपही कुऱ्हाडीने तोडून टाकण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले. या भागातील गोरगरिबांना हटवून ती जागा हडप करण्याचा सपाटा या झोपडीदादाने लावला असल्याच्या तक्रारी पालिकेत आल्या आहेत.

दरम्यान, आज सकाळी ह प्रभागाचे प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मोरे व भंगाळे यांच्या पथकाने रेतीबंदर रोडवर असणारे सरकारी जमिनीवरील ११ गाळे जमीनदोस्त केले. यावेळी गाळेधारकांनी पालिकेच्या पथकाला शिवीगाळ करून गाळे तोडण्यास विरोध केला. पण पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याने हे गाळे धडक कारवाईने जमीनदोस्त करण्यात आले. बहुतांशी गाळे मटण- मच्छी व किरकोळ सामान विक्रीचे होते. या कारवाईने चाळ मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही कारवाई करण्यात आली. कोपररोड रेल्वे स्टेशन पूर्व भागात काही चाळी अलीकडच्या काळात उभारण्यात आल्या आहेत. या चाळीही जमीनदोस्त करण्याच्या कागदोपत्री कार्यवाही पालिकेने पूर्ण केली आहे. यामध्ये काही लोकप्रतिनिधींचा सहभाग असल्याची चर्चा आहे.

 
Page 9 of 16

Vastushastra Consultant

Advertise here

Call 9819024528