Dombivli Forum: Online portal for City of Dombivli

You are here:
Group Wall
kaushal
Source:Sakaal

ब्रह्मदेव लग्नाच्या गाठी बांधतो असे म्हटले जाते. पण तुम्ही डोंबिवलीत राहत असाल तर तुमच्या लग्नाची गाठ फडके रस्त्यावर बांधली जाते, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फडके रस्त्यावर तरुणाईचा महासागर लोटला होता. पहाटेपासूनच फडके रस्त्याकडे येणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. फडके रस्त्यावर होणारी गर्दी या वर्षी मात्र काहीशी फडके रोडला लागून असलेल्या दोन्ही रस्त्यांवर विखुरली गेली होती. यात केवळ तरुणांचाच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश होता. गणेश मंदिराच्यावतीने सुस्मिता ताम्हणकर दिग्दर्शित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यात डोंबिवलीतील कलाकारांनी हजेरी लावली होती, तर दुसऱ्या बाजूला सिटी केबलतर्फे दिवाळी जल्लोष कार्यक्रम झाला. पहाटेपासूनच डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरात दर्शनासाठी रीघ लागली होती.
Saturday, 06 November 2010 10:27
 
kaushal
Source: Loksatta

पारंपरिक कपडे परिधान केलेले तरुण-तरुणी, विविध परफ्युम्स आणि अत्तराचा दरवळ, रस्त्यावर रेखाटलेली मोठी रांगोळी आणि उसळलेली तरुणाई हे शुक्रवारच्या पहाटेचे डोंबिवलीच्या प्रसिद्ध फडके रोडवरचे दृश्य होते. तरुणाईच्या या उत्साहात यंदाच्या वर्षी दस्तुरखुद्द मनसेचे प्रमुख राज ठाकरे सहभागी झाले होते.दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रोडवर तरुणाईचा सागर उसळलेला असतो. तरुण-तरुणी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा त्यात विशेष सहभाग असतो. डोंबिवलीचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फडके रोडवरील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे दिवाळीच्या पहिल्या दिवशी येथे ‘युवा शक्ती आणि भक्तीदिन’ साजरा केला जातो. या अंतर्गत विविध स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम येथे होतात.

http://dombivliforum.com/dombivli/index.php/2010110686/Articles/2010-11-06-04-45-04.html
Saturday, 06 November 2010 10:18
 

Vastushastra Consultant

Advertise here

Call 9819024528