सोलापूर / प्रतिनिधी - रविवार, २० मे २०१२ २००७-२०३१ पर्यंतच्या कालावधीसाठीचा ७७३४ कोटी खर्चाचा शहर विकास आराखडा आतापर्यंत पन्नास टक्के मार्गी लागल्याचा दावा महापालिकेचे आयुक्त अजय सावरीकर यांनी केला.शहर विकास आराखडय़ातून महापालिकेने हाती घेतलेली विकास कामे व त्यात करावयाच्या सुधारणांचा आढावा घेण्यासाठी महापौर अलका राठोड यांनी बोलावलेल्या बैठकीत आयुक्त सावरीकर यांनी शहर विकास आराखडय़ाच्या आढावा सादर केला.
तुळजापूरला जाताना अपघात सोलापूर / प्रतिनिधी तुळजापूरकडे देवदर्शनासाठी निघालेल्या तवेरा गाडीला टँकरची जोरात धडक बसून घडलेल्या अपघातात तवेरा गाडीच्या चालकासह तिघाजणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य आठजण जखमी झाले. जखमींमध्ये एका मुलीसह चार महिलांचा समावेश आहे. सोलापूर-तुळजापूर रस्त्यावर शहराजवळ उळे येथे शनिवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास हा अपघात झाला.
सोलापूर / प्रतिनिधी माळशिरस तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची साठवण करता यावी यासाठी विविध सामाजिक व सहकारी संस्थांच्या सहयोगाने ३५ टाक्यांचे वाटप जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्या हस्ते करण्यात आले. अकलूज येथे आयोजित या कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.